जागतिक पर्यावरण दिनानिमित्त साफसफाई
बुलडाणा, दि. 07 - ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम आता थेट आपल्या घरात येऊन पोहचलेत. ऋतूचक्रात झालेले तीव्र बदल आपण सारे भोगतो आहोत. वेळीच जागे झालो नाही तर येणार्या पिढ्या अन निसर्ग आपल्याला क्षमा करणार नाही. खरंतर हे आपल्याला माहित आहे. पण पर्यावरणासंदर्भात नेमके काय करता येईल. या विवंचनेत जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून कर्तव्य दक्ष तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर परिसरातील टाकाऊ प्लास्टिक पिशव्या, टाकाऊ बिसलरी बॉटल, व इतर पर्यावरण दुषित करणार्या घाण कचरा जमा करून साफसफाई करण्याची संकल्पना मनात आणली आणि 5 जून रोजी सकाळी 6 वाजता कमळजा माता टावर परिसरातील कचरा व टाकाऊ प्लास्टिक जमा करून परिसर स्वच्छ करण्यास सुरवात केली.
यामध्ये जेष्ट पत्रकार डॉ. अनिल मापारी, प्रकाश सानप, प्रा. गजानन खरात, डॉ. भास्कर मापारी, संतोष जाधव, सचिन कापुरे, विलास जाधव, गजानन बगाडे, डॉ. दयानंद ओव्हर, अरुण देवराव मापारी यांनी सहभागघेतला. या मध्ये विशेष म्हणजे अथर्व भास्कर मापारी, विराज संतोष जाधव, सरी संतोष जाधव या चिमुकल्यांनी सुध्दा खारीचा वाटा उचलला आहे. 5 जूनपासून एक संपूर्ण आठवडाभर लोणार सरोवर परिसर स्वच्छ करण्याचा वसा वरील सर्व पर्यावरण प्रेमिंनी घेतला आहे.