‘अनुराधा अर्बन’कडून मदत
बुलडाणा, दि. 07 - तालुक्यात वादळीवार्यासह झालेल्या मान्सुनपुर्व पावसात धोडप येथील श्रीमती कमलबाई तुळशिराम खरोले या महिलेचे घरावरील टिन-पत्रे उडून गेले व झालेल्या पावसाने दैनंदीन गरजेसाठी लागणारे धान्य, कपडे, वार्यामुळे उद्वस्त होवून या कुटूंबावर उपासमारीची आणि उघडयावर राहण्याची वेळ येवून ठेपली. कमलबाई तुळशिराम खरोले महिलेची व कुटूंबाची ही पावसाने केलेली वाताहत परीसरातील लोकांनी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांना कळविल्यावर त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अनुराधा अर्बन को.बँकेच्या सामाजिक उपक्रम निधीतून या कुटूंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनुराधा अर्बन बँक चिखलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंढरीनाथ टेकाळे यांनी या कुटूंबाला मदत देण्यासाठी जीवनावश्यक वस्तू आणि रोख रक्कम देवून या आकस्मिक संकटात त्यांना आमदार राहुलभाउ बोंद्रे यांचे उपस्थितीत बँकेचे संचालक शैलेश भागडीया यांच्या हस्ते मदत देण्यात आली. यावेळी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.