लोणावळ्याच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करणार - मुख्यमंत्री
पुणे, दि. 02 - मुंबई-पुणे रस्त्यावरील पर्यटनस्थळ म्हणून लोणावळा प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग बघण्यासाठी तसेच प्रसिद्ध अशी लोणावळा चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. त्यामुळे शहराचा सर्वोत्तम विकास व्हावा यासाठी सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळ्यात बोलताना दिले.
लोणावळा नगर परिषदेतर्फे 32 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या नव्या सदनिकेचे उद्धाटन गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
लोणावळा येथे बहुमजली वाहनतळ उभारणे, रुग्णालयाला निधी देणे, खंडाळा तलाव तसेच रोपवे विकसित करणे, या योजनांना नगरविकास विभागाच्या मदतीने मदत केली जाणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. लोणावळाच्या घनकचर्याचे एका वर्षात विलीगीकरण व्हायला हवे, तसेच त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया व्हायला हवी, त्यासाठी आधुनिक पध्दतीने नगर परिषदेने आराखडा तयार करावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या नवीन प्रशासकीय इमारतीतून प्रशासनात गतीमानता यावी. नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. लोकांचे कोणतेही काम अडू नये, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
राज्यातील शहरे विकासाची इंजीन आहेत. त्यामुळे शहरांचा विकास व्हावा असे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी म्हणून विविध शहरांना राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात 21 हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढेही निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी आमदार संजय भेगडे यांचेही भाषण झाले. नगराध्यक्ष जाधव यांनी प्रास्ताविक तर उपनगराध्यक्ष चौधरी यांनी आभार मानले.