Breaking News

वर्षाअखेरीस राम मंदिर निर्मितीला सुरूवात केली जाणार, विश्‍व हिंदू परिषदेचा दावा

नवी दिल्ली, दि. 22 - या वर्षाअखेरीस राम मंदिर निर्मितीला सुरूवात केली जाणार असून निर्मितीसाठीचे शिळा अयोध्येत पोहोचवण्यात आले आहेत, असा दावा  विश्‍व हिंदू परिषदेकडून करण्यात आला आहे. 26 जुलै रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतील तयारीची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचेही  त्यांनी सांगितले.
विश्‍व हिंदु परिषदेचे वरिष्ठ नेते त्रिलोकी नाथ पांडे यांनी सांगितले की, सोमवारी राजस्थानच्या भरतपूरमधून शिळा आणण्यात आल्या असून त्याचा वापर राम मंदिर  निर्मितीसाठी केला जाणार आहे. या शिळा विश्‍व हिंदु परिषदेच्या अयोध्येतील मुख्यालय कारसेवक पुरम उतरवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी  2015मध्ये अशाच प्रकारे राम मंदिर निर्मितीसाठी देशभरातून शिळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो अयशस्वी ठरला होता.