Breaking News

क्षयरोगाशी निगडीत सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य

नवी दिल्ली, दि. 22 - क्षयरोगाशी निगडीत सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड नंबर देणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाने यासंदर्भातले परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. आधार कार्ड नसलेल्या रुग्णांसाठी 31 ऑगस्टपर्यंतचा कालावधी सरकारकडून देण्यात आला आहे. अशा  रुग्णांसाठी आरोग्य मंत्रालयातर्फे आधार नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देणार आहे.
आधार कार्ड मिळेपर्यंत रुग्णांना नोंदणीसाठी अर्ज केल्याच्या पावतीद्वारे सरकारी योजनेचा लाभ घेता येणार असून पॅन कार्ड, मतदार नोंदणी कार्ड, बँकेचे पासबुक,  रॅशन कार्ड ही कागदपत्रे दाखवूनही ते लाभ घेऊ शकणार आहेत. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणार असून जम्मू काश्मीर, आसाम आणि मेघालय या  राज्यांमध्ये हे आदेश लागू होणार नाहीत, असे परिपत्रकात म्हटले आहे.