Breaking News

उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्राव्हिस कालनिक यांनी दिला राजीनामा

डेट्रॉइट, दि. 22 - उबर या टॅक्सी सेवा पुरविणा-या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापक ट्राव्हिस कालनिक यांनी आज पदाचा राजीनामा  दिला. कंपनीच्या संचालक मंडळाने या वृत्तास दुजोरा दिला आहे.
कालनिक यांच्या आईचे निधन झाल्याने ते दुखात आहे आणि यातून त्यांना बाहेर येण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेता आहे. या निर्णयामुळे  कंपनीने नव्याने सुरुवात करणार आहे, असेही मंडळाने सांगितले. कालनिक यांच्या आईचे एका नौका अपघातात निधन झाले आहे.कंपनीने सोमवारी (19 जून) 180  दिवसांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत कंपनी नव्याने आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये उबर पच्या माध्यमातून  वाहन चालकाची माहिती देण्याची नवी सुविधा सुरु केली आहे.