Breaking News

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याने सुरूवातीला अडचणी येऊ शकतात - व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली, दि. 27 - वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याने सुरूवातीला अडचणी निर्माण होऊ शकतात, असे वक्तव्य केंद्रीय शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले आहे . वस्तू आणि सेवा कर प्रणालीनंतर अडचणी वाढू शकतात असे ट्विट नायडू यांनी केले आहे. प्राथमिक स्तरावरील अडचणींवर आम्ही तातडीने उपाय योजना करू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच वस्तू आणि सेवा कर परिषदेतही या अडचणींवर तोडगा काढून करप्रणाली जास्तीत जास्त सुरळीत करण्यावर आणि सगळ्या अडचणी संपवण्यावर भर दिला जाईल असेही ते म्हणाले. 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
जीएसटीमुळे महागाई वाढेल हा दावा मूर्खपणाचा असल्याचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतरामन यांनी रविवारी म्हटले होते.