एअर एशियाची ग्राहकांसाठी ‘ब्राऊज बुक बोर्ड’ योजना सुरु
नवी दिल्ली, दि. 27 - एअर एशिया कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 950 रुपयांची ब्राऊज बुक बोर्ड ही विशेष सेवा सुरु केली. या योजनेअंतर्गत नवी दिल्ली, गोवा, बंगळुरु, हैदराबाद, पूणे, कोलकाता यांसारख्या ठिकाणांचा प्रवास केवळ 950 रुपयांमध्ये करता येणार आहे. 26 जून ते 23 नोव्हेंबर या दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 26 जून ते 2 जुलैपर्यंत तिकीट आरक्षित करावे लागणार आहे.
दरम्यान, योजनेचा लाभ घेणा-या प्रवाशांना बंगळुरू-कोच्ची, बंगळुरु-हैदराबाद,बंगळुरु -गोवा या मार्गावरील प्रवासासाठी 950 रुपये मोजावे लागणार आहेत.तर हैदराबाद-गोवा प्रवासासाठी 1,450 रुपये, हैदराबाद-कोच्ची 1,650 रुपये, कोलकाता-रांची 1,250 रुपये, नवी दिल्ली- क्वालालांपूर 6,690 रुपये मोजावे लागणार आहेत. ग्राहकांना कंपनीचे संकेतस्थळ किंवा कंपनीच्या कार्यालयात जाऊन तिकीट आरक्षित करता येणार आहे.