कुख्यात गँगस्टर आनंदपालच्या एनकाउंटरची सीबीआय चौकशी व्हावी, राजपूत समाजाची मागणी
नवी दिल्ली, दि. 27 - राजस्थानातील कुख्यात गँगस्टर आनंदपाल सिंगचे एनकाउंटर बनावट होते, असा दावा राजपूत जमाजाच्या लोकांनी केले असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आनंदपालची आईही याप्रकरणी उपोषणाला बसली असून त्याचा मृतदेह स्विकारणार नसल्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. आनंदपालच्या मृत्यूनंतर त्याचे मुळगाव सांवरादमध्ये संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यावेळी पोलीस अधिका-यासह कंमाडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याबाबत बोलताना गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्हणाले की, आनंदपालच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह स्विकारून त्याच्यावर अंत्यसंस्कार करावेत. याशिवाय आंदोलने करणा-यांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.