Breaking News

बसपाच्या वतीने रक्तदान शिबीर

बुलडाणा, दि. 01 - बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव संदीप ताजने यांची नुकतीच पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्त बुलडाणा जिल्हा शाखेच्या वतीने 29 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीरात भाग घेवून रक्तदान केले. देशभरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. अपघातातील रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा व गोरगरीब बहुजन बांधवांच्या आरोग्याच्या सोयीसाठी मदत व्हावी, या हेतूने बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रशांत डोंगरदिवे, रविकिरण मोरे, देवानंद वानखेडे, विनोद गवई, समाधान ताजने, राहूल गवई, संघर्ष माघाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी रक्तदात्यांना डॉ.पाटील व डॉ.चुकेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.