Breaking News

ना.फुंडकरांची गुरुद्वाराला भेट

बुलडाणा, दि. 01 - ऐतिहासिक गुरुद्वारा कदमसर साहेब या धार्मिक स्थळाच्या सर्वागिण विकासाकरीता शासनाकडून भरघोस निधी मिळवून देवू. या विकास कामाकरीता आम्ही कटीबध्द असल्याची ग्वाही कृषीमंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. 
28 मे रोजी शहरातील सालीपुरा परिसरातील ऐतिहासीक गुरुद्वारा कदमसर साहेब या धार्मिक स्थळी ना. फुंडकर व आ. चैनसुख संचेती यांनी सदिच्छा भेट देत गुरुग्रंथ साहिबांचे दर्शन घेतले. यावेळी दिल्ली येथील कारसेवा ट्रस्ट बंगलासहाब गुरुद्वाराचे प्रमुख बाबा बचनसिंग, बाबा महेंद्रसिंग व बाबा सुरेंद्रसिंग आदि मान्यवराच्या हस्ते नव्याने निर्मित होत असलेल्या धार्मिक गुरुद्वाराच्या इमारतीची पायाभरणी शुभारंभ करण्यात आला.  यावेळी ना. फुंडकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलतांना, या धार्मिक स्थळाला आपण कसलाही निधी कमी पडू देणार नाही. आ.संचेती व आम्ही स्वत: त्यादृष्टीने प्रयत्नशील राहू असे आश्‍वासन दिले. तर गुरुद्वारच्या विकासाकरीता जे काही करता येईल ते करण्याचासवरेतोपरी प्रर्यंमी या कुटुंबातील एक सदस्य म्हणून प्रामाणिकपणे करेल असे प्रतिपादन आ. संचेती यांनी केले. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे, भाजपानेते शिवचंद्र तायडे, जि.प.सदस्य केदार एकडे, अशांत वानखेडे, मोहन शर्मा, शंकरराव पाटील, रमेशसिंह  राजपूत, दामोधर लखानी, भाऊसाहेब भाटीया, श्रीचंद राजपाल, अर्जुनदास निहलानी, सरदरमल आहुजा, प्रकाश मंगतानी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रामसिंग ठाकूर, संचलन विनोद राजदेव यांनी तर आभार प्रदर्शन रणजितसिंग कपूर यांनी केले.