Breaking News

सुचाता श्रॉफ हिच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पुणे, दि. 29 - भरधाव वेगात गाडी चालवून आई व मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली बांधकाम व्यावसायिकाची पत्नी सुचाता श्रॉफ हिच्या विरोधात न्यायालयात  दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. ही घटना 17 एप्रिल रोजी बाणेर भागात घडली होती. 
सुजाता श्रॉफ हिच्यावर भारतीय दंड विधान कलम 304, 304(अ), 279, 338 मोटार वाहन कायदा कलम 132(1)(क),179,184,119/177 आदी कलमे  लावण्यात आली आहेत. या अपघातात पूजा अजयकुमार विश्‍व)कर्म(24) आणि ईशिका अजयकुमार विश्‍वणकर्म(3) या मायलेकींचा मृत्यू झाला होता. तसेच शाहरुख  पीरअली शेख(24), साजिद शाहीद शेख(4) हे गंभीर जखमी झाले होते. अजयकुमार विश्‍वाकर्म (30) यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.  अपघातातील मृत व जखमी हे डि मार्ट येथे खरेदी करुन घरी परतताना हा अपघात झाला. या व्यक्ती रस्ता दुभाजकावर रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असताना  त्यांना भरधाव वेगात आलेल्या श्रॉफ यांच्या गाडीने उडवले होते. यामध्ये पूजा व ईशिका विश्‍वकर्म यांचा मृत्यू झाला. याप्रकरणा श्रॉफ यांना 18 एप्रिल रोजी अटक  करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी श्रॉफ यांना योग्य ती कलमे लावली नसल्याचाही आरोप झाला होता. दरम्यान पोलिसांनी तपास करत  दोषारोपत्र दाखल केले आहे.