Breaking News

बालगंधर्व सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे, दि. 29 - आजकाल फिल्म इंडस्ट्रीमधील परिस्थिती पाहिली, तर सर्वच नट एकमेकांशी हेवेदावे करताना पहायला मिळतात. त्यांचे अनेक बाबींवर एकमेकांशी  मतभेद देखील पहायला मिळतात. एखाद्याला प्रोत्साहन देण्याऐवजी पाय ओढण्याचे कामही त्यांच्याकडून केले जाते. हे तात्काळ थांबायला हवे. असे मत ज्येष्ठ अभिनेते  मोहन जोशी यांनी केले.
बालगंधर्व परिवाराच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी  यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. सौमित्र पोटे यांनी अभिनेते मोहन जोशी यांची मुलाखत घेतली. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, अखिल  भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले उपस्थित होते. याप्रसंगी बालगंधर्व रंगमंदिराचे काम पहाणार्या बॅकस्टेज कलाकारांचा सन्मान करण्यात  आला.
यावेळी अभिनेते जोशी म्हणाले, सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित सोहळा सातत्याने सुरू राहावा. पुणेकर रसिक प्रिय, चोखंदळ तसेच क्रोधिष्ठ देखील आहेत. याचा  मला आतापर्यंतच्या वाटचालीत सतत अनुभव येत राहिला आहे. लहानपणी मी नव्या पेठेत वाड्यात रहायाचो. तेथे प्रत्येक वेळी विविध सणांनिमित भोंडला, गाण्यांचे  कार्यक्रम तसेच नाटकेही होत. त्यात माझा सह्भाग हिरीरीने असायचा. वडिलांच्या हे लक्षात आले. आणित्यांनी मला भरत नाट्य मंदिर येथे पाठविले. तेव्हा मी  सहावी-सातवीतील विद्यार्थी होतो.
1967 सालापासून नाटक करायला सुरूवात केली. कॉमर्समधून पासही झालो. त्यावेळी माझ्या तीन गाड्या ट्रान्सपोर्टला होत्या. 1987 साली माझ्या गाडीला अपघात  झाला. आणि मी स्वत:ला पुर्णपणे नाट्यक्षेत्राला झोकून दिले. त्यावेळी नशिबाने मला मुंबईवरून बोलवणे आले होते. तसे पाहिले तर मी अभ्यासात मध्यमवर्गीय होतो.  मात्र, तेव्हा मला समजले कि, माणसाकडे हुशारी नसेल तर कला असतेच. बॉलीवूडमध्येही मला नशिबाने उत्तमोत्तम भूमिका पार पाडायला मिळाल्या. बॉलीवूडमधील  गंगाजल हा माझा शेवटचा चित्रपट होता. मी आयुष्यात अनेक लोक पाहिली आहेत. जी मेहनत करतात, पण आयुष्यात म्हणावी इतकी यशस्वी होत नाहीत. त्यांची  मेहनत कमी पडते का त्यांचे नशीब त्यांना साथ देत नाही. हाच मला मोठा प्रश्‍न पडतो.