Breaking News

माजी न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

नवी दिल्ली, दि. 21 - कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाच्या सात  सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. कर्णन यांना काल(20 जून) कोईमतूर येथून अटक करण्यात आली आहे.
9 मे रोजी सात सदस्यांच्या खंडपीठाने न्यायमुर्ती कर्णन यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर  कर्णन फरार झाले होते. यानंतर काल त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.याप्रकरणी त्यांची चौकशी किंवा सुनावणी  न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास किंवा शिक्षा रद्द करण्यास नकार दिला.