Breaking News

सौदी अरेबियामध्ये अनिवासी नागरिकांच्या करात वाढ, 41 लाख भारतीयांना फटका

रियाद, दि. 21 - सौदी अरेबियामध्ये आपल्या कुटूंबासह राहणा-या अनिवासी नागरिकांकडून ‘डिपेंडेंट टॅक्स’ कर आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येथे  राहणा-या 41 लाख भारतीयांना त्याचा फटका बसणार आहे. सौदी अरेबियामध्ये राहणा-या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय 1  जुलैपासून लागू करण्यात येणार असून जे नागरिक कामानिमित्त येथे वास्तव्यास आहेत आणि त्यांच्यासह त्याचे कुटूंबही आहे, असा नागरिकांकडून 100 रियाल  म्हणजे 1700 रुपयांचा कर आकारण्यात येणार आहे. या कराचा भार सहन न होणारे अनिवासी नागरिक आपल्या कुटूंबियांना पुन्हा भारतात पाठविणार असल्याचे  काही भारतीयांकडून सांगण्यात आले आहे.
सौदी अरेबियामध्ये पाच हजार रियाल म्हणजे 86 हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणा-या अनिवासी नागरिकांना सौदी अरेबिया सरकारकडून कुटूंब व्हिसा देण्यात  येतो. तसेच एका कुटूंबामध्ये पती-पत्नी आणि दोन मुले राहत असतील तर त्या कुटूंबाकडून पाच हजार रुपये कर आकारणी करण्यात येते. अद्याप तरी सौदी  अरेबियाने घेतलेल्या निर्णयावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून वक्तव्य करण्यात आले नाही.