विवाहीत महिलेवर सामुहिक बलात्कार
सातारा, दि. 21 - पतीस मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देत विवाहीत महिलेवर खेड, ता. सातारा हद्दीतील शेतात रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, 21 वर्षीय विवाहीत महिला रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पतीसोबत वाढेफाटा येथून चालत होती. वाढेफाटा येथील कॅनॉल लगतच्या पुलाजवळ आले असता विशाल मुकाप्पा कोळी व नवनाथ प्रकाश जाधव दोघे. रा. लक्ष्मी टेकडी यांनी पती सलीम शेख यास अडवून आमच्या रिक्षातील बॅटरी चोरलीस म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. ती विवाहीत महिला भांडणे सोडवत असता सलीम यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच नवनाथ याने सलीम पकडून विशाल कोळी याने तिला शेजारी असलेल्या शेतातील झुडपात नेहून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा विशालने सलीमला पकडून नवनाथ याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्या दोघांनी मिळून सलीम यास बेदम मारहाण करत त्या घटनास्थळापासून लांब नेहले. त्यानंतर ती तशीच अंधार लपून राहिली. सकाळी पहाटे 4 वाजता सलीम व त्याचे मित्रांनी तिला शोधून काढल्यानंतर पोलिसात तक्रार दिली. सातारा शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास पोउनि. चौखंडे करत आहेत.