शिवसेना नेते दिनेश लखोटे यांचे अपघाती निधन
जळगाव, दि. 21 - जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि जामनेर शहरातील सदा हसतमुख व्यक्तीमत्व, सर्वांना नेहमी मदत करणारे दिनेश लखोटे यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या वाहनास आज सकाळी एक अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले होते. यानंतर त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युनंतर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
