Breaking News

बोगस कागदपत्राच्या आधारे शिष्यवृत्ती लाटणार्‍या शिक्षण संस्थांची चौकशी करा

अहमदनगर, दि. 29 - मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नावाने बोगस प्रवेश प्रक्रिया बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे दाखवून त्यांचे नावे कोट्यावशी रुपयांची शिष्यवृत्ती लाटणार्‍या शिक्षण संस्थांची चौकशी करुन तातडीने कायदेशीर कारवाई करावी व व्यंकटेशन पथकाच्या कामकाजावरील स्थगीती तातडीने उठवून त्यांना इरत संस्थांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मानवाधिकार जनआंदोलनच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी अ‍ॅड.संतोष भानुदास गायकवाड, सध्या दिपक मेढे, संदिप लक्ष्मण बुरकके आदिसह मानवाधिकार जनआंदोलनाचे तसेच विद्यार्थी अधिकार परीषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे की, गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता संस्थाचालकच बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस प्रवेश दाखवून त्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची शिष्यवृत्ती हडप करत आहेत. काही कॉलेजेस तर यासाठीच स्थापन करण्यात आलेली आहेत. संस्था चालकांच्या अशा प्रवृत्तीमुळे गरीब व गरजू मागसवर्गीय खरे विद्यार्थी या लाभापासून वंचि राहत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरीता तयार केलेल्या गोष्टीचा उपयोग संस्थाचालक चुकीच्या मार्गाने करत असल्याने तातडीने चौकशी करावी. तसेच शिक्षण संस्था चालकांनी सदरच्या व्यंकटेशन पथकाच्या कारवाईवर तसेच त्यांच्या सुरु असलेल्या चौकशीवर मे.हायकोर्टाकडून स्थगिती घेतलेली आहे, ती तात्काळ उठवून सदरहू शिक्षण संस्थेची चौकशी करुन त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी व गोरे, गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी निवेदन कर्त्यानी आठवले यांच्याकडे केली आहे.