तरुण बळाचे रुपांतर मानव संसाधनात करणार - मुख्यमंत्री
नागपूर, दि. 27 - कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून दहा हजार युवकांना करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल. हे केंद्र नागपूरसाठी वरदान ठरणार असून मोठ्या प्रमाणात युवावर्गाला कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून ती केवळ लोकसंख्या न राहता या तरुण बळाचे रुपांतर मानव संसाधनात करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आज नागपूर येथे मेडीकल चौकातील स्पंदन सभागृहात एचडीएफसी बँक, फ्लुअल व ओरियन एज्युटेक संस्थेच्यावतीने आयोजित करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. प्रमुख पाहुणे मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी, आमदार डॉ. आशिष देशमुख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख, प्रसिध्द चित्रपट निर्माते सुभाष घई, एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी नुसरत पठाण, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, भंडार्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, ओरियनचे संचालक मनिष अग्रवाल, फ्लुअलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन देशपांडे, ओरियन एज्युटेकचे संचालक संजीव कोठारी यांची मंचावर उपस्थित होती.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, अशाच प्रकाचे केंद्र अमरावती येथे सुरु झाले आहे. राज्यातील सर्व जिल्हयात अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कौशल्य विकास हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. देशातील 65 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतील तर 50 टक्के लोकसंख्या 25 वर्षाच्या आतील आहे. एवढया मोठया प्रमाणात असलेल्या युवा वर्गाला कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यास ही केवळ लोकसंख्या न राहता ती मानव संसाधन होईल. ही लोकसंख्या मानव संसाधनात परिवर्तित झाल्यास आपला देश समृध्द तर होईलच सोबत जगातील इतर देशाला मानव संसाधन देण्याचे काम देखील यामधून होणार असल्याचे सांगितले.
मागील 50 वर्षात आपण कौशल्य विकसित करु शकलो नाही असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील तीन वर्षात देशात कौशल्य विकासाचा विकास होत आहे. आता या प्रशिक्षणामुळे चांगले मानव संसाधन मिळणार आहे. त्यामुळे देशातील युवकांचे देशाच्या विकासात व अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान राहणार आहे. राज्यात नवव्या वर्गापासून कौशल्याबाबतचे समुपदेशन करण्यात येत आहे. सोबतच विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची रुची कोणत्या क्षेत्रात आहे हे बघितले जाते. शिक्षण विभागाने चांगला निर्णय घेतला असून कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करण्यात येणार नाही. दहावीत कमी गुण घेणार्या विद्यार्थ्यांला कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्याचे कौशल्य विकसित केले जाते. पदवी घेवून बेरोजगार राहण्यापेक्षा कौशल्य विकसित करुन रोजगार प्राप्त करण्यास त्याला सक्षम करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
श्री. रुडी म्हणाले, कौशल्य काय आहे आणि ते प्राप्त केल्यानंतरचे चांगले परिणाम काय आहेत हे वेगवेगळया प्रकारच्या कौशल्य प्राप्त व्यक्तींकडे पाहिले की दिसून येते. जीवनाला सुंदर, सरळ आणि यशस्वी बनविण्याचे काम कौशल्य विकासाच्या माध्यमातून होत आहे. कौशल्य विकास ही पंतप्रधानाची देण आहे. महाराष्ट्रात कौशल्य विकासाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. वेगवेगळया प्रकारच्या प्रशिक्षणातून कौशल्य विकसित होत आहे. आज ओला, उबेर सारख्या कंपन्यांना तीन लाख वाहन चालकाची गरज आहे. ड्रॉयव्हरमध्ये प्रवाशांसोबत बोलण्याचे कौशल्य असले पाहिजे. कौशल्य विकसित झालेल्या युवकांची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगून श्री. रुडी म्हणाले, आज महाराष्ट्रामध्ये 90 टक्के गुण घेणारे सुध्दा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे वळत आहेत. महाराष्ट्रात मोठया प्रमाणात खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य दिसून येत नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सुध्दा शाळाबाहय विद्यार्थी चांगले कौशल्य विकसित झालेले दिसतील. राज्य शासनाच्या मदतीने राज्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकासाचे जाळे तयार करुन मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देवू असेही रुडी म्हणाले. यावेळी प्रसिध्द दिग्दर्शक सुभाष घई यांच्या संस्थेसह विविध संस्थांशी कौशल्य विकासाबाबतचे सामंजस्य करार करण्यात आले. कौशल्य विकासाबाबतची माहिती देणारे स्टॉल सभागृहाच्या परिसरात लावण्यात आले होते. नागपूर व भंडारा जिल्हयातील मोठया संख्येने युवावर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होता.