Breaking News

प्रत्येक पोलीसाने कर्तव्य ठोस बजावले तर गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल

अहमदनगर, दि. 28 - आज आपण पहातोय की, जिल्हयात गुन्हे करणार्‍यांचे प्रमाण वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जबरी चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हयामध्ये मोठया प्रमाणात वाढ् झाली आहे. प्रत्येक पोलीसाने आपले कर्तव्य ठोस बजावले तर गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल असे प्रतिपादन पोलीस मित्र संघटना, शहर अध्यक्ष अमित इधाटे यांनी केले. 
तोफखाना निरीक्षक, राकेश मानगांवकर व त्यांच्या सहकारी पोलीसांनी नुकतीच केलेली एक मोठी कारवाई करुन रॅकेटला जरेबंद केल्यामुळे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख  सुमित दरंदले, शहर अध्यक्ष अमित इधाटे, शहर कार्येध्यक्ष अंकुश भापकर, उपनगर अध्यक्ष  किरण मेहेत्र,  राजेंद्र कर्डिले, पोलीस  कॉ. दिपक रोकले, भास्कर गायकवाड, संजय काळे, धिरज अभंग आदी उपस्थित होते.
भारतात नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस असतात. पोलीस आले असे म्हटले की, चांगल्या चांगल्याची हवी निघुन जाते. पण पोलीसांच्या अकार्यक्षमते मुळे, दुर्लक्षामुळे शहरासह जिल्हयात गुन्हेगारी घटनात वाध् झाली. चोरांना पोलीसाचे व कायदयाचे भय राहिलेले नाही. 17 जुन ला तोफखाना पोलीसांनी जी एक कोटीची कारवाई केली अशा कारवाया जर सतत गुन्हेगारांवर होत राहील्या तर मोठया प्रमाणावर गुन्हेगारांना चाप बसेल. व दोन नंबरचे धंदे करणार्‍यांवर वचक निर्माण होईल.