Breaking News

वारकर्‍यांच्या सेवेतच खरी विठ्ठलभक्ती

। हभप जंगले महाराज शास्त्री

अहमदनगर, दि. 28 - उन, वारा, पाऊस याचा तमा न बाळगता तो पायी पंढरपुरकडे जात आहे. या काळात वारकरांना अनेक अडचणींना तोंडा द्यावे लागत आहे. दिंडी मार्गावर अनेक  सामाजिक सेवा संस्था, मंडळे या वारकर्‍यांची सेवा करुन ईश्‍वर प्राप्तीचा आनंद घेत आहेत. फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून वारकर्‍यांची मोफत्र आरोग्य व नेत्र तपासणी करुन जो औषधोपचार केले. त्यामुळे वाकर्‍यांचा पुढील प्रवास सुखकर होणार आहे, वारकर्‍यांची केली जाणारी सेवा ही ईश्‍वर सेवा असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांनी केले.
फिनिक्स फौंडेशनच्यावतीने डोंगरगण येथील पंढरपुरकडे जाणार्‍या दिंडीतील वारकर्‍यांची मोफत आरोग्य व नेत्रतपासणी करुन औषधे देण्यात आली. याप्रसंगी हभप जंगले महाराज शास्त्री, माजी महापौर भगवान फुलसौंदर, फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ.सुहास वाळेकर, डॉ.एस.जे.खन्ना, केमिस्ट असो.चे सागर फुलसौंदर, साहिल अहमद, गंगाराम धाडगे, गोकूळ गिलचे, मोहन कुर्‍हे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना हभप जंगले महाराज शास्त्री म्हणाले,  अनेक वारकर्‍यांना वयोमानाप्रमाणे, हवामान, नित्यनियम बिघडल्याच त्रास होत असतो, या होणारा त्रास फिनिक्ससारख्या सेवाभावी संस्था दूर करतात. त्यामुळे वारकर्‍यांचा प्रवास सुखकर होत असतो. ईश्‍वराच्या आज्ञेेनेच त्यांच्या हातून घडत असते. असेच कार्य यापुढेही सुरु राहो.
याप्रंसगी माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले, वारकरी दिंडीने पंढरपुरकडे रवाना होत आहे. त्यांच्या दिंडीतील प्रवास चांगला व्हावा, त्यांना कोणत्याही अडचणी येवू नये म्हणून दिंडीतील वारकर्‍यांचे ठिकठिकाणी मंडळे, संस्थांच्यावतीने सेवा केली जात आहे. या सेवेत फिनिक्स फौंडेशनने आरोग्य व नेत्रतपासणी करुन मोठे योगदान दिले आहे, त्यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
सुरुवातीला जालिंदर बोरुडे यांनी दिंडी चालक हभप जंगले  महाराज शास्त्री यांचे स्वागत केले. यावेळी 117 वारकर्‍यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. यावेळी डॉ.एस.जे.खन्ना,  डॉ.सुहास वाळेकर, सागर फुलसौंदर, साहिल अहमद आदिंनी  वारकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार केले.