सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक
अहमदनगर, दि. 22 - सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी अडचणीत असलेल्या सहकारी संस्थांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे सांगतानाच सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज पाथर्डी येथे केले.
पाथर्डी येथे नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन वास्तुचा लोकार्पण सोहळा श्री. बागडे यांच्या उपस्थितीत झाला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. बागडे बोलत होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, तालुका ग्रामोदयोग संघाचे अध्यक्ष भगवान बांगर, तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष उत्तम गर्जे आदी उपस्थित होते.
शतकोत्सव वाटचाल करणा-या बँकापैकी नगर अर्बन बँकेचा उल्लेख करावा लागेल असे सांगून श्री बागडे म्हणाले, सर्वसामान्यांच्या जिवनात आर्थिक पत निर्माण करून जिल्हयाचा आर्थिकस्तर उंचावण्यामध्ये बँकेचे भरीव योगदान आहे. सहकार चळवळीत संस्था कशा पद्धतीने चालविल्या जातात, यावर सहाकाराचे प्रतिबिंब अवलंबून आहे. याच पदधतीने नगर अर्बन बँकेने सहकार क्षेत्रात दिशादर्शक काम करून नेत्रदिपक प्रगती केली असल्याचे श्री. बागडे यांनी सांगितले.
हरिभाऊ बागडे म्हणाले की, राज्यात नागरी बँकाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. नागरी बँकांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला मदत केली जाते. ठेवी आणि कर्जवाटप यांचे संतुलन ठेवणार्या बँका पुढे जाऊ शकतात. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या जुन्या आठवणींना श्री. बागडे यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.
यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत गरजू महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांची भाषणे झाली. यावेळी विविध संघाचे पदाधिकारी सहकार क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.