दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडुन बोलेरो वाहनासह शस्त्रास्त्रे केली जप्त
अहमदनगर, दि. 22 - दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीनजाणांच्या टोळीला नागरिक व पोलिसांनी पाठलाग करुन नगर तालुकयातील चास परिसरात मैर्या हॉटेलसमोर पकडले. त्यांच्या ताब्यातुन बोलेरो वाहन गुन्हयासाठी वापरण्यात येणारे शस्त्रे व रोकड असा सुमारे पाच लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असते तरी यातील दोघेजन पळुन जाण्यात यशस्वी झाले आहेत.
असीम अतिक शेख (रा.चांदा,नेवासा), शुभम रमेश खरात (रा.एमआयडीसी), दीपक रविकांत उपाध्ये (रा.केडगाव) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
सलीम व सईजाल (संपुर्ण नाव माहिती नाही) हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अशोक अबनावे व सहकारी गस्त घालत असताना विनाक्रमांच्या बोलेरोमधून दरोडे खोरीच्या तयारीत असलेली टोळी जेरदबंद केली आहे.