Breaking News

मेहकर-शिर्डी बसफेरीचा शुभारंभ

बुलडाणा, दि. 02 - एस.टी.महामंडळाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जून रोजी मेहकर आगारातर्फे मेहकर ते शिर्डी या नवीन बस फेरीचा शुभारंभ करण्यात आलाा. तसेच बसस्थानक शुशोभित करण्यासोबतच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 
1 जून रोजी एस.टी.महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त बसस्थानक, बस गाड्यांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केळीचे खांब, आंब्याच्या डहाळ्या, पुष्पमाला लावून बस स्थानक शुशोभित करण्यात आले. याप्रसंगी मेहकर ते शिर्डी बसफेरीचे उद्घाटन आगार व्यवस्थापक चंद्रकांत पाथरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवाशांना गुलाबाचे फूल भेट देवून स्वागत करण्यात आले. एस.टी.तर्फे देण्यात येणार्‍या विविध सोयी सुविधांची माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक एस.आर.जोगदंडे यांनी दिली. पत्रकारांसाठी आगारात चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर धामोडे यांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखाकार अशोक चांदणे, कार्यशाळा अधीक्षक हर्षल साबळे, नागेश कांगणे, नारायण सिरसाट, समाधान जुमडे, प्रताप आघाव, दत्तात्रय वानखेडे, विनोद चेके, अनिल साळवे, देविदास राठोड, दत्तात्रय वायाळ, भानुदास सराटे, गोरख उगले, रमेश मानवतकर, निर्मला लोढे, गीता सास्ते, नीता खरात, नीता भांडारे, सुलभा थोरवे आदींनी परिश्रम घेतले. आगाराअंतर्गत येणार्‍या लोणार, सिंदखेड राजा बसस्थानकातही एस.टी.महामंडळाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. आगारातील विविध उपक्रम विभाग नियंत्रक अनिल म्हेतर, विभागीय वाहतूक अधिकारी सुभाष पाटील, यंत्र अभियंता अकोलावाला यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.