ईदचा सण काश्मीरमध्ये शांतता रुजवण्यास मदत करेल - राजनाथ सिंग
नवी दिल्ली, दि. 27 - मानवतेचा संदेश देणारा ईदचा सण काश्मीरमध्ये शांतता आणि बंधुभाव रुजवण्यास मदत करेल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलीआहेत्यांनी देशवासायांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व काश्मीरमध्ये बंधुता व शांतता नांदण्यासाठी प्रार्थना केली.
राजनाथ यांनी चित्रफित प्रसिद्ध करत काश्मीरी रहिवाशांना शुभेच्छा दिल्या. काश्मीरमधील सर्व नागरिकांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा. माणुसकी व सकल जनांचे भले व्हावे म्हणून साजरी करण्यात येणारा ईदचा सण काश्मीरमध्येही बंधुता व शांतता रुजवण्यात मदत करेल याची मला खात्री आहे, असे त्यांनी आपल्या चित्रफितीत म्हटले आहे.