Breaking News

जीएसटीला स्थगिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुंबई, दि. 28 - वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल करण्यात आली. निवृत्त प्रा.  डॉ. के.एस.पिल्लई यांनी ही याचिका दाखल केली आहे. यावर 29 जून रोजी सुनावणी होणार आहे.
सरकार वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करण्यात घाई करत आहे. जर सरकारला लागू करायचे होते तर 2018-19 च्या अर्थसंकल्पानंतर लागू करायला हवे  होते. आर्थिक वर्षाच्या मध्येच लागू केल्यास लोक व अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि गोंधळाची स्थिती निर्माण होईल, असे प्रा. पिल्लई यांचे म्हणणे आहे.