Breaking News

माजी अध्यक्ष दिलीप बाफना यांना अटक जामखेड मर्चंट बँक खोटे सोने घाटाळा प्रकरणी

अहमदनगर, दि. 22 - जामखेड मर्चंट बॅक  खोटे सोने घोटाळे प्रकरणी बॅकेचे माजी अध्यक्ष दिलीप बाफना यांना आज दि. 21 रोजी नगर येथून अटक करण्यात  आली आहे.  याकामी  सहाय्यक पोलिस निरिक्षक विलास कुलकर्णी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. बाफना यांची तब्येत खालवल्यामुळे जामखेड ग्रामीण  रूग्णालयाचे वैदयकिय अधिकारी यांनी नगर येथे पाठविले आहे. 
जामखेड  मर्चंट बॅकेत असलेली अनियमितता वाढता एन. पी. ए. सोने तारणामध्ये झालेला घोटाळा यामुळे रिर्झव्ह बॅकेने या बॅकेचा परवाना रद्द करून बॅकेवर  अवसायक म्हणून अंजली वाघमारे यांची नियुक्त केली. बॅकेच्या लेखा परिक्षक म्हणून अजय राठी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या लेखा परिक्षणात सोने  तारण घोटाळा उघडकीस आला. आणि राठी यांनी दि. 17 रोजी जामखेड पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चेअरमन कर्मचारी संचालक, सोने  व्यापारी, असे 17 जणाविरोधात फसवणूकीचा गून्हा दाखल केला आहे. त्यानंतर दि. 20 जून रोजी  सहाय्यक पोलिस निरिक्षक विलास कुलकर्णी यांच्या पथकाने  पंचनामा करून सर्व मुदद्ेमाल ताब्यात घेतला आहे. त्यानंतर 17 आरोपींच्या शोधात पोलिसांनी पथके रवाना केले होते. यातील बॅकेचे माजी अध्यक्ष दिलीप बाफना  यांना दि. 21 रोजी नगर येथून अटक करण्यात आली आहे.अटक करून जामखेड येथे आल्यानंतर त्यांना जामखेड ग्रामीण रूग्णालयात तपासणी कामी हजर केले  असता त्यांचे बायपास झाल्यामुळे वैदयकीय अधिकार्‍यांनी  जामखेड येथे पुरेशी   सुविधा  नसल्यामुळे बाफना यांना नगर  येथे हलविण्यात आले आहे. बाफना यांनी  अटकपूर्व जामीणासाठी प्रयत्न देखील केले होते. या घटनेमुळे तालूक्यात एकच खळबळ उडाली असून इतर 16 आरोपींना कधी अटक होणार यांची चर्चा रंगू लागली  आहे.