नगर येथील तरुण व्यापरी कटारिया दाम्पत्यांचा अपघाती मृत्यू
अहमदनगर, दि. 22 - कल्याणहून कुटुंबासह कारने नगरकडे येणार्या व्यापरी कटारिया यांच्या कारला समोरुन वेगाने येणार्या कारने धडक दिली. धडक इतकी जोराची होती की या धडकेत कटारीया दाम्पत्य जागीच ठार झाले. तर त्यांची दोन मुले या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नगर कल्याण रोडवरील कायमुखवाडी (तालुका जुन्नर) येथे मंगळवारी रात्री घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगरमधील औषध व्यापारी सागर जवाहरलाल कटारिया (वय 36, रा.सारसनगर) हे काही कारणास्तव कुटुंबासह कल्याण येथे त्यांच्या मारुती अल्टो (क्र.एमएच 16 एटी 7843) ने गेले होते. तेथील आपले काम आटोपून मंगळवारी रात्री नगरकडे येत असताना जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी येथे त्यांच्या कारला समोरुन वेगात येणार्या इनोव्हा कारने ( क्र.एमएच 05 सीएच 6001) समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, यामध्ये सागर जवाहरलाल कटारिया व त्यांची पत्नी श्वेता सागर कटारीया यांचा जागीच मृत्यू झाला. यात मुलगी तनिष्का व मुलगा रक्षक गंभीर जखमी झाले.