Breaking News

खरेदी-विक्री संघावर कर्डिले गटाचे वर्चस्व, विरोधकांच्या महाआघाडीला भोपळा

अहमदनगर, दि. 27 - नगर तालुका खरेदी विक्री-संघाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाने सर्व 17 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व कायम राखले. विरोधी शिवसेना-काँग्रेसच्या महाआघाडीला एकही जागा मिळविता आली नाही. या विजयाने भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला असल्याची चर्चा होती.
तालुका खरेदी विक्री-संघाची रविवारी निवडणूक झाली. संघाच्या सेवा संस्था मतदार संघातील दहा जागांसाठी 105 पैकी 104 मतदारांनी म्हणजे 99 टक्के मतदान झाले. वैयक्तिक महिला राखीवसह अन्य सात जागांसाठी 2 हजार 524 मतदान झाले. म्हणजे 87 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. अडीच हजार मतदारापैकी मृत व दुबार मतदारांची संख्याही बर्‍यापैकी होती. त्यामुळे संघासाठी चुरशीने मतदान झाले. भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेत सकाळी 8 ते दुपारी चार वाजेपर्यत मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. या संघात भाजपप्रणीत शेतकरी विकास मंडळाचे सर्व 10 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. महाआघाडीने या मतदारसंघात केवळ पाच उमेदवार उभे केले होते. या मतदारसंघातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
केशव अडसुरे, 74, अप्पासाहेब कुलट 77, श्रीकांत जगदाळे 83, डॉ.अनिल ठोंबरे 83, लक्ष्मण नरवडे 74, अंबादास बेरड 77, छत्रपती बोरुडे 78, रोहिदास मगर 81, ज्ञानदेव शेळके 83, सुरेश सुंबे 77, (सर्व भाजप) तर विरोधी महाआघाउीच्या बाबासाहेब भोर 28, अरुण काळे 24, राहुल वाकळे 35, गोवर्धन म्हस्के 29, वामन जाधव 25 असे मते मिळाली.
व्यक्तिगत मतदारसंघातून भाजपचे संभाजी पवार 970, अंबादास शेळके 967 मिळवून विजयी झाले. महिला राखीव मधुन शारदा काहे यांना 1092, मीरा बोठे 1061 मते मिळवून विजयी झाल्या. अनुचित जाती जमातीतून भाजपचे रमेश आंग्रे सर्वाधिक 1142 मते मिळवुन विजयी झाले. भटक्या विमुक्तजाती जातीतीतुन बबनराव पडोळे 1088 मते मिळवुन विजयी. इमाव मधुन तुकाराम वाघुले निवडणुक अधिकरी म्हणून हरिश्‍चंद्र कांबळे यांनी काम पाहिजे.