Breaking News

पिंपळगाव खांड धरणात वेगाने आवक; कोतूळ पूल पाण्याखाली

अकोले, दि. 27 - मुळा नदी वाहू लागल्याने  मुळा नदीवरील आंबीत पाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण भरण्याच्या मार्गावर आहे.  अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने मुळा नदी वाहू लागली आहे. नदीच्या उगमा वरील आंबीत प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने नवीन पाण्याची आवक आता पिंपळगावखांड धरणात सुरु झाली आहे धरणात एका दिवसात 360 दलघफू नवीन पाणी जमा झाले आहे यामुळे धरण  80   टक्के भरले आहे
पिंपळगावखांड धरण भरण्याच्या मार्गावर  आहे. मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा काहीसा जोर कमी झाला तरी पाण्याची आवक सुरूच आहे पिंपळगाव खांड धरणात नवीन पाणी साठा होत असल्याने धरणातील पाणी फुगवत्या  मुळे कोतूळ येथील मुळा नदीवरील पूल आज रविवारी दुपारी पाण्याखाली गेला. शनिवारी सायंकाळी 5 वाजता या धरणात नवीन पाण्याची आवक सुरु झाली होती. आवक सुरु होण्यापूर्वी धरणात अवघे 40 दलघफू पाणी शिल्लक होते . एका दिवसात धरणात 360   दलघफू नवीन पाणी जमा झाले धरणाची साठवण क्षमता 600 दलघफू असून धरणाचे काम अपूर्ण असल्याने धरणात 500 दलघफू पर्यंत पाणी साठा  होऊ शकतो त्यानंतर धरणाच्या 189 मीटर लांबीच्या मध्य  सांडव्या वरून पाणी नदीपात्रात प्रवाहित होते पुढे ते अकोले- संगमनेर तालुक्याचे लाभ क्षेत्रातून राहुरी ला मुळा धरणात जमा होते मुळा धरणात  नवीन पाण्याची आवक सुरु होण्यासाठी अजून दोन ते तीन  दिवसाचा कालावधी लागू शकतो
अकोले तालुक्यातील मुळा परिसराचे दळण वळण कोतूळ पुला वरून सुरु असते मात्र आता पूल पाण्याखाली गेल्याने  सहा ते सात महिने पूल पाण्याखाली राहणार आहे.  अकोले कोतूळ मार्गावरील वाहतूक आंता पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे कोतूळ धामनगाव पाट -मोग्रस -पांगरी  या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.  सदर मार्ग अतिशय  खराब व कमी रुंदीचा असल्याने वाहतुकीस अडथळा येतो  शिवाय हां मार्ग दूरचा असल्याने प्रवाशांना मानसिक व आर्थिक फटका बसत आहे.  पूल  वाहतुकीसाठी बंद झाल्यने दुचाकीस्वारांनी आता होडीचा आधार घेत  नदी पार करून आपला प्रवास सुरु केला आहे  पुल बंद झाल्याने जीव धोक्यात घालून अवैधरीत्या या ठिकाणी आता होडीचा वापर होत आहे होडी चालक अवाजवी व जादा पैसे वसूल करत प्रवाशांची लुट करत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली. मुळा नदी वाहू लागली व पिंपळगाव खांड धरण भरण्याचे मार्गावर असल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी आनद व्यक्त केला  तर मुळा धरण लाभक्षेत्रातील शेतकरी ही मुळा धरणात पाण्याची आवक धरणात सुरु होण्याची प्रतीक्षा करत आहे. ग्रामस्थांनी मुळा नदीला साडी चोळी श्रीफळ अर्पण करत पूजन केले. मागीलवर्षी पिंपळगाव खांड धरण 3 जुलै 2016 रोजी  ओव्हर फ्लो झाले होते. यावर्षी पिंपळगाव खांड धरण सहा, सात दिवस आगोदर भरणार आहे.