आगामी मनपा प्रक्रियेत खा.गांधी, आगरकर गटाला दुर ठेवा
अहमदनगर, दि. 27 - महापौर निवडणुकीपासुनच भाजपचे दोन गट उघड उघड समोर दिसत आले आहेत. यामध्ये खा. गांधी आणि अॅड. अगरकर यांनी महापौर निवडणुकीत जेंव्हा दत्तात्रय कावरे यांना माघार घेण्यासाठी जो शब्द दिला त्याच वेळेपासून हा वाद सुरु झाला. याआधिही काही परस्थिती चांगली होती असे नाही तर ती चव्हाट्यात कधी आली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या गोंधळानंतर भाजपच्या गटातटाचे राजकारण समोर आले असून आता भाजपमधुनच मागणी होत आहे की भविष्यातील मनपा निवडणुकीतुन खा.गांधी व अॅड.आगरकर यांना दुर ठेवावे, काहीही असो मात्र आरोप प्रतिआरोपाने आता राजकीय रंगत येणार असल्याचेही शहरात चर्चेले जात आहे.
खासदार दिलीप गांधी आणि अॅड.अभय अगरकर यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे भारतीय जनता पक्षाची अवस्था शहरात बिकट होत चालली आहे. यांना महापालिकेच्या आगामी निवडणुकीत बाजुला ठेवल्यास भाजपची एकहाती सत्ता येईल असे मत गट्टानी यांनी व्यक्त केल्याने दोघानांही पक्षाने दुर ठेवावे अशी मागणी त्यांनी वरिष्ठाकडे केल्याची माहिती मिळाली आहे. तर यातुन आता नेहरु मार्केटचा वादही चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसत आहेत.
नगरपालिकेत शिवसेनेची कोंडी करु इच्छिणार्या भारतीय जनता पक्षातच आता मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच आता परस्परविरोधी आरोप -प्रतिआरोप सुरु झाले असुन पक्षश्रेष्ठीपर्यंत ही गार्हाणी गेली आहेत. दोन्ही गटाकडुन आता मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र दिलेले शब्द पाळले जाणार की नाही यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.