Breaking News

जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलडाणा, दि. 06 - शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावे, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देण्यात यावा, शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी आदी महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून जळगाव शहरासह जामोद, पिंपळगाव काळे, आसलगाव, वरवंट, संग्रामपूर आदींसह सर्वच गावांमध्ये व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकर्‍यांच्या बंदला पाठिंबा दिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप, व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला. 5 जून रोजी बसस्थानकासमोर भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देत कांदे, वांगे, दुधाच्या कॅन रस्त्यावर फेकून दिल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे, जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत, अनंता बकाल, गजानन देशमुख, प्रसेनजित पाटील, डॉ.स्वातीताई वाकेकर, ज्योतीताई ढोकणे, लता तायडे, पराग अवचार, रामेश्‍वर काळे, प्रविण भोपळे, संदीप उगले, फापटसर आदींनी शासनाचा निषेध व्यक्त करणारी भाषणे केली. बंदच्या यशस्वीतेसाठी अविनाश उमरकर, एम.डी.साबीद, शे.जावेद, युनूस खान, संजय धुरडे, सुनिल येणकर, प्रकाश घोंगटे, अर्जुन घोलप आदींनी परिश्रम घेतले.