Breaking News

अपघातात तरूण दांपत्याचा मृत्यू

औरंगाबाद, दि. 29 - मुंबईमध्ये राहणा-या एक दाम्पत्याचा लासूर स्टेशन रोडवर अपघातात मृत्यू झाला. यास्मिन तनवर या महिलेच्या बहिणीचा मृत्यू मुंबईमध्ये  झाला होता तिचा मृतदेह तिच्या मूळगावी मेहकर येथे घेवून यास्मीन होंडासिटी गाडीतून निघाली होती. तिच्या बरोबर पती मसूद आणि दोघेजण होते. लासूर रोडवर  या गाडीतला अपघात झाला त्यात दोघेजण जखमी झाले तर यास्मीन आणि तिचा पती मसूद या नवविवाहित तरूण जोडप्याचा मृत्यू झाला मृत यास्मिन गर्भवती  होती.जखमीवर औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात उपचार चालु आहेत.