अमेरिकेतील कंपन्यांना भारतात येण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
वॉशिंग्टन, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर असून आज त्यांनी येथील कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतील उद्योगपतींना भारतात येण्याचे व गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे.
या भेटीत एलेक्स गोर्स्की (जॉन्सन ऍण्ड जॉन्सन), सुंदर पिचाई (गुगल), डग मॅकमिलन (वॉलमार्ट), टिम कुक (एपल), जेफ बेजोस (अमेजॉन), जिम उंपलेबी (कॅटरपिलर) यांसह अन्य उद्योगपती सहभागी झाले होते. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिका-यांसह अमेरिकेतील काही नेतेही उपस्थित होते. परदेशी कंपन्यांनी भारतात येऊन उद्योग करावा, यासाठी कायद्यांत अनेक दुरुस्त्या केल्या असून त्यामुळे प्रक्रिया खूप सहज व सोपी झाली आहे. जेणेकरून ॠकिमान सरकार व अधिक शासन’ (मिनिमम गव्हर्नमेंट एण्ड मॅक्सीमम गव्हर्नन्स) करणे शक्य होत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.