विविध सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला विश्वासार्हता मिळाली - अरुण जेटली
नवी दिल्ली, दि. 02 - मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला विश्वासार्हता मिळण्यास मदत झाली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे सांगितले.
गेल्या तीन वर्षांत भारत जागतिक स्तरावर पुढे आला. मोदी सरकारला एक कमकुवत अर्थव्यवस्था मिळाली. त्यातही गेल्या तीन वर्षांत जगभरात आर्थिक आघाडीवर अनेक आव्हाने होती . तीन वर्षांपूर्वी धोरणात्मक सुधारणांमधील मंदी व देशात संरचनात्मक बदल झाले नव्हते. भ्रष्टाचार व अनिर्णायकतेमुळे अर्थव्यवस्थेची विश्वासार्हतेच्या दृष्टीने कमजोर होती, असे जेटली म्हणाले.
सरकारने सुरू केलेल्या सुधारणांमुळे भ्रष्टाचार रोखण्यास मदत होत आहे. मागील तीन वर्षांत सरकारने अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. सुधारणांमुळे थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ देशात वाढला, असेही जेटली म्हणाले.
सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या विकास दरात मंदी आली. सकल राष्ट्रीय उत्पन्नावर अनेक गोष्टींचे परिणाम होतात. निश्चलनीकरणाच्या आधीही काही प्रमाणात मंदीचे वातावरण होते. जागतिक स्थितीच्या तुलनेत देशाचा 7 ते 8 टक्के विकास दर सामान्य असून ही योग्य वाढ आहे. वस्तू व सेवा कर लागू झाल्यावर त्याचे विपरीत परिणाम होणार नसल्याचेही जेटली यांनी स्पष्ट केले.