Breaking News

सीरियातील इसिसच्या तळांवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला

मॉस्को, दि. 02 - रशिया युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या सहाय्याने सीरियामधील पालमायरा येथील इसिसच्या ठिकाणांवर हल्ला केल्याचे रशियाकडून सांगण्यात  आले. भूमध्य सागरातून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
युद्धनौका डमिरल स्सेन आणि पानबुडी क्रासनोडारने चार वेळा हल्ला केला. मात्र करण्यात आलेला हल्ला नेमका कोणत्यावेळी केला हे स्पष्ट झाले नाही असे रशियाच्या  लष्कराकडून सांगण्यात आले.
अमेरिका, तुर्कस्तान आणि इस्रायल लष्करास संवाद माध्यमाद्वारे क्षेपणास्त्र हल्ल्याची सूचना दिल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. संरक्षण मंत्री सर्गेई शोईगू यांनी  राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यशस्वी हल्ल्याची माहिती दिली.