Breaking News

वृक्षांप्रमाणे आपणही आपली यशाची कामान उंच करावी - झोडगे

अहमदनगर, दि. 28 - सध्या सर्वच क्षेत्राचा वेगाने विकास होत आहेत. त्याचबरोबर शिक्षणाच्याही संकल्पना बदलत आहेत. पारंपारिक शिक्षण पद्धती आता कमी होऊन तांत्रिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही वाढ होताना दिसत आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात जो जमान्याबरोबर चालून हे तंत्रज्ञान आत्मसात करु शकेल, तोच पुढे जाऊ शकतो. या वेगवान युगात मार्कांची स्पर्धा न करता आपल्या आवडत्या विषयात प्राविण्य मिळविले पाहिजे. त्यासाठी झोकून देऊन अभ्यास करावा लागेल. विद्यार्थ्यांनी या सत्कारात मिळालेल्या रोपांचे संवर्धन करुन वृक्षांप्रमाणे आपणही आपली यशाची कामान उंचच करावी, असे प्रतिपादन भिंगार अर्बन बँकेचे अध्यक्ष गोपळराव झोडगे यांनी केले.
भिंगार येथे सिद्धेश्‍वर प्रतिष्ठानच्यावतीने इ.10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रोपे देऊन भिंगार बँकेचे अध्यक्ष गोपाळराव झोडगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जि.प.सदस्य शरद झोडगे, नगरसेवक अनिल बोरुडे, जालिंदर बोरुडे, नाथाजी राऊत, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, शिवाजी बनकर, अनिल झोडगे, ज्ञानेश्‍वर धाडगे, चंद्रशेखर धाडगे, विकास धाडगे, भोलेनाथ धाडगे, अजय धाडगे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना गोपाळराव झोडगे म्हणाले, 10 वी व 12 वी ही शिक्षणातील महत्वाची वर्षे असल्याने विद्यार्थ्यांनी यात मिळविलेले यश हे कौतुकास्पद असेच आहे. पुढील वाटचालीत या यशाला फार महत्व असून, मिळालेल्या यशाच्या जोरावर व समाजाने दिलेल्या प्रोत्साहनावर आपण निवडलेल्या क्षेत्रात भरीव कार्य करावे.  सिद्धेश्‍वर प्रतिष्ठानने या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना जे प्रोत्साहन दिले, त्याचा पुढील जीवनात नक्कीच उपयोग होईल, असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जि.प. सदस्य शरद झाडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन सिद्धेश्‍वर प्रतिष्ठानने गुणवंत विद्यार्थ्यांचा रोपे देऊन जो सत्कार केला.