Breaking News

जामखेड बाजार समितीमध्ये ऑनलाईन लिलाव सुरू

अहमदनगर, दि. 21 -  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचे बाजारभाव ऑनलाईन लिलाव पध्दतीने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना  राज्यातील बाजारभाव पहावयास मिळतील. या ऑनलाईन लिलाव पध्दतीची पाहणी जागतीक बँकेचे अधिकारी, फुकेन, बिझनेस तज्ञ व इतर अधिकारी यांनी पाहणी  केली. 
बाजार समितीच्या आवारात सुरू झालेली ऑनलाईन लिलाव पध्दतीची पाहणी करण्यासाठी जागतीक बँकेचे अधिकारी रविशंकर नटराजन तसेच फुकेन बिझनेस तज्ञ  तसेच एमएसीपीचे विजय देवळे, ज्युनियर इंजिनिअर विठ्ठल पवार, जितेंद्र बिसेन, बाजार समितीचे सभापती गौतम आण्णा उतेकर व बाजार समिती संचालक संजय  वराट, संचालक महादेव डुचे, संचालक मकरंद काशिद, संचालक करण ढवळे, संचालक अरुणराव महारनवर, संचालक विनोद नवले, बाजार समितीचे सचिव सय्यद  वाहेद, सहाय्यक सचिव रावसाहेब सदाफुले, किरण मोरे, अशोक मुळे, लक्ष्मण कांबळे, इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती गौतम आण्णा उतेकर म्हणाले, जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा पालक मंत्री राम शिंदे यांनी बाजार समितीला शंभर टक्के अनुदानावर  ऑनलाईन लिलाव पध्दतीचे साहीत्य मिळवून दिले. व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक प्रा.लि.या कंपनी मार्फत सध्या ऑनलाईन लिलाव सेवा चालू केली आहे.
ऑनलाईन लिलाव पध्दतीमुळे शेतकर्‍यांना राज्यातील बाजारभाव समजतील त्यामुळे त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाला किंमत किफायतशीर मिळती का ?  याबाबत आकलन होईल. ऑनलाईन लिलावाचे स्क्रीन बाजार समितीच्या आवारात आडत व्यापार्‍यांच्या बाजूला शेतकर्‍यांना दिसेल अशापध्दतीने लावले आहेत.  हिंगणघाट (वर्धा जिल्हा) येथील ऑनलाईन पध्दत पाहण्यासाठी संचालक मंडळ, व्यापारी व कर्मचारी जाणार आहेत. ऑनलाईन लिलाव सुरू झाल्यामुळे बाजार  समितीला वैभव प्राप्त झाले आहे.