Breaking News

कृषी कन्यांचे तिखी गावात ग्रामस्थांकडून स्वागत

अहमदनगर, दि. 21 -  मिरजगांव येथिल सदगुरू कृषी महाविदयालयातील कृषी कन्यांचे मौजे तिखि गावात ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी स्वागत केले.
मिरजगांव येथिल सदगुरू कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी आंतर्गत कृषी विद्यालयातुन कृषी विषयक शिक्षण घेत असलेल्या विदयार्थी  विदयार्थींनी जे शास्त्रयुक्त पध्दतीने नवनविन तंत्रज्ञान आवगत केले असुन त्यांचे शेेतकर्‍यांना फायदे कशा प्रकारे होतील तसेच शेती विषयक उपलब्ध असलेले  नवनविन धोरणे कशा प्रकारे राबवायची याची सखोल माहीती शेतकर्‍यांना समजावुन सांगण्यासाठी ग्रामिण कृषी कार्यांनुभव कार्यक्रम राहुरी कृषी विद्यापिठ आंतर्गत  घेतला जातो. यासाठी मिरजगांव येथिल सदगुरू कृषी विद्यालयातील कृषी विषयी आभ्यास करणार्‍या कृषी कन्या कर्जत तालुक्यातील मौजे तिखि गावतील शेतकर्‍यांशी  संवाद साधत शेती विषयी नवनविन आलेल्या तंत्रज्ञानाची माहीती देण्यासाठी त्यांच्या समस्या समजावुन घेवुन त्याचे निराकरण करणे शेती साठी महत्वाची बाब  असलेली माती परीक्षण किती महत्वाचे आहे हे समजावुन सांगितले तसेच जल संधारणचे महत्व पटवुन दिले. तसेच शेतीला जोड व्यावसाय आसणारा जनावरांचे  संगोपण ,बिज प्रक्रिया यासारखी माहीती शेतकर्‍यांना देवुन काही प्रात्यक्षिके करून दाखवली तसेच शेतकर्‍यांचेशेती विषयी आसणरे अनुभव ही या कृषी कन्यांनी  समजावुन घेतले.
 यावर रिसर्च करण्यासाठी कृषी कन्या चोखर प्रिती, दळवी आश्‍विनी, बोरसे क्रांती, होले भक्ती, पोटकुले प्रियंका, शेख रूकसार यांनी यामध्ये सहभाग घेतला आसता  या सर्व कृषी कन्यांचे कर्जत तालुक्यातील तिखि गांवचे सरपंच किशोर आडसुळ, ग्रा.प. सदस्य अजिनाथ दळवी, सुमित दळवी, चेअरमन अंकुष कोरडे, सह ग्रामस्थांनी  व येथिल शेतकर्‍यांनी त्यांचे स्वागत केले तर या कृषी कन्यांना विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिटे सर, प्रा. गोरे, प्रा.चाकणे मॅडम, प्रा. करनावर,  प्रा. निकत यांचे मार्गदर्शन  लाभले