Breaking News

10 रुपयांची नाणी न स्विकारल्याच्या निषेधार्थ ठिय्या

अहमदनगर, दि. 21 -  शहरात राष्ट्रीयकृत व को-ऑपरेटीव्ह बँकांकडुन 10 रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार देणार्‍या बँका विरोधात कारवाई करण्याची मागणी  करत शहर सुधार संघर्ष अभियानाच्या वतीने बँकेचत ठिय्या आंदोलन केले. मॅनजेरच्या लेखी आदेशानंदरच आंदोलन थांविण्यात येईल अशी भुमीका घेतल्याने  आंदोलनकर्त्यांना मॅनेजरने लेखी आश्‍वासन दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाकीर खेख, उबेद शेख, अजय चितळे, संजय झिंजे, दिपक सुळ, अशोक बाबर, दत्ता वामन, जितू शिंदे, धना बोरुडे आदि सहभागी  झाले होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,  अहमदनगर जिल्हयात व शहरात विविध राष्ट्रीकृत बँका, शेडुयल बॅक, को-ऑप बँक यांनी 10 रुपयांची नाणी  स्विकारण्यास बंद केलेले आहे. त्यामुळे नागरिकांची, व्यापार्‍यांची मोठ्या प्रमाणात अडवणुक होऊन गैरसोय होत आहे. याबाबत भारतीय स्टेट बँकेकडे अनेक  नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत. तसेच काही वृत्तपत्रांनीही वृत्त प्रसिध्द केलेले आहे. तरी सुध्दा बँका दाद देत नसल्याने आंदोलनाचा मार्ग पत्रकारावा लागला आहे.  चलन ना स्विकारणे हा गुन्हा असल्याचेही  निवेदनात म्हंटले आहे.