वाळूच्या ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, गावकर्यांनी ट्रक पेटवला
भंडारा, दि. 22 - भरधाव वाळूच्या ट्रकनं दिलेल्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यात ही घटना घडली आहे. अपघातानंतर संतप्त गावकर्यांनी ट्रक थांबवत त्याला आग लावली. धडक देणारा ट्रक पेटवून गावकरी थांबले नाहीत, तर त्यांनी मागून येणार्या इतर वाळूच्या ट्रकचीही तोडफोड केली आणि पेटवून दिले. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्मिशमन दलाच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. प्राची मांडावलकर असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव असून ती दहावीत शिकत होती. ट्यूशन क्लासवरुन परत येत असताना ट्रकच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. प्राचीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करत रास्तारोको करण्यात आला.