नागपूरमध्ये हायटेन्शन वायरच्या स्पर्शानं तीन बालकांचा मृत्यू, 6 संस्थांना नोटीस
नागपूर, दि. 22 - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठानं महावितरणसह 6 संस्थांना नोटीस बजावली आहे. खंडपिठानं हायटेन्शन वायरमुळे 10 दिवसात 3 बालकांच्या मृत्युप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. 10 दिवसात 3 मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने दखल घेतली होती.
नागपूरमध्ये गेल्या 10 दिवसात हायटेन्शन वायरमुळे दोन जुळ्या भावंडांचा आणि त्यानंतर आणखी एका चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. यानंतर हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठानं महावितरण, महापारेषण, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नगर विकास विभाग, ऊर्जा विभाग यांना नोटीस बजावली आहे. तसंच या बाबतीत न्यायालयानं न्यायालयीन मित्र म्हणून वकिलाची नियुक्ती केली होती. याप्रकरणी आज गुरुवारी नागपूरमधील हायटेन्शन वायरच्या शॉकमुळे झालेल्या जुळ्या भावंडांच्या मृत्यूप्रकरणी पहिली कारवाई करण्यात आली आहे. जुळ्या भावंडांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर आनंद खोब्रागडेला अटक करण्यात आली आहे.