कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी विशेष विमान सेवा
नवी दिल्ली, दि. 23 - कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी सरकारकडून विशेष विमानांची सोय करण्यात आली आहे. कतारमध्ये जवळपास 7 लाख भारतीय आहेत. सौदी अरेबिया सहित अन्य आठ देशांनी कतारबरोबरचे संबंध तोडले आहेत.
दहशतवाद्यांना कतारकडून पैसा पुरवला जात असल्याचा आरोप कतारवर करण्यात आला आहे. कतार देशाबरोबर सौदी अरेबियाने नाते संबध तोडल्यामुळे कतारमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडत आहे.
दरम्यान कतार विवादाप्रकरणी आम्हाला फक्त भारतीयांची चिंता आहे, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. 25 जून ते 18 जुलै दरम्यान एअर इंडियाद्वारे विशेष विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.