अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, 24 जणांचा मृत्यू
काबुल, दि. 23 - अफगाणिस्तानमधील हेलमंद राज्यातील लश्करगाह शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता ही घटना घडली असून हा आत्मघातकी स्फोट होता. याबाबत गर्व्हनर उमर जाक यांनी सांगितले की, जखमींमध्ये नागरिकांसह लष्कराच्या जवानांचाही समावेश आहे. बँकेबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला, असे त्यांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. 31 मे रोजी काबुलमध्ये अशाच प्रकारे आत्मघातकी स्फोट करण्यात आला होता. त्यात 80 जणांचा मृत्यू झाला होता. तर 350 जण जखमी झाले होते.