Breaking News

पोलीस बंदोबस्ताअभावी हॉकर्स स्थलांतर प्रक्रिया लांबणीवर

जळगाव , दि. 05 - ख्वाजा मियाँ झोपडपट्टीच्या जागेवर हॉकर्सला स्थलांतरीत करण्यासाठी मनपा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त मागविला होता. परंतु पोलीस  बंदोबस्त न मिळाल्याने दुस-यांदा पुन्हा स्थलांतरची प्रक्रिया बारगळली.
शहरातील बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला ख्वाजा मियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्याचा निर्णय मनपा  प्रशासनाने घेतला.
त्यानुसार महासभेत ठराव देखील करण्यात आला आहे. स्थलांतर प्रक्रिया करण्यासाठी 782 हॉकर्स धारकांची जागा सोडत द्वारे निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार  प्रशासनाने स्थलांतराची कार्यवाही करण्यास सुरुवात केली होती. मात्र वाद होवून तणाव निर्माण झाल्याने प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्या
नंतर प्रशासनाने आज स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोलीस बंदोबस्तसाठी मनपा प्रशासनाने पत्र दिले.