महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करणार -दत्तात्रय कराळे
जळगाव, दि. 05 - जिल्ह्यात सायबर क्राईम, महिलांविषयीचे गुन्हे व अपघात नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, विभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक बोलतांना पुढे म्हणाले की, जिल्हयात अपघाताचे प्रमाण अधिक असून 20 ते 40 वयोगटातील मयतांची संख्या अधिक आहे.
त्यामुळे अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अपघात स्पॉटचे सर्व्हेक्षण करणार असून येत्या काही दिवसांत शाळा व महाविद्यालयात अपघात नियंत्रणासाठी मुंबई येथील विनय मेटे यांचे वाहतुकीचा दहशतवाद या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.तसेच दिवसेंदिवस वाढणार्या सायबर क्राईमच्या घटना रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.