सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाने घेतली आदित्यनाथ यांची भेट
लखनौ, दि. 02 - ग्रेटर नोएडामधील पोलीस ठाण्याजवळ पडलेल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाने आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी आदित्यनाथ यांनी पीडितांच्या कुटुबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यार असल्याचे सांगितले.
या घटनेच्या तपासाबाबत आम्ही सकारात्मक आहोत असे भेटीदरम्यान पीडित कुटुंबाने आदित्यनाथ यांना सांगितले. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.
ग्रेटर नोएडामधील पोलीस ठाण्याजवळ काही अज्ञात दरोडेखोरांनी गाडीतून जाणा-या एका कुटुंबाला घेरून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. मात्र त्यांनी विरोध केल्यामुळे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला गोळी घालून ठार केले होते. तसेच चार महिलांवर बलात्कार केला होता.