नोटा रद्दमुळे विकास दरात घट होण्याचा माझा अंदाज खरा ठरला - पी. चिदंबरम
नवी दिल्ली, दि. 02 - नोटा रद्दचा परिणाम विकास दरावर होवू शकतो हे मी यापूर्वीच सांगितले होते, असे प्रतिपादन काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आज केले. या नोटा रद्दच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावेल ही माझी भविष्यवाणी खरी ठरली. सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या विकास दरावर याचा 1 ते 1.5 टक्के परिणाम झालेला दिसून येईल, असे त्यांनी ट्विटरद्वारे नमूद केले.
देशाच्या अर्थव्यवस्थेची गती जुलै 2016 पासून मंदावली होती. त्यात सरकारने नोटा रद्दचा निर्णय घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम दिसून आला. मार्च 2017 मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) दरात घट होवून तो 6.1 टक्के इतका आहे. मात्र मागील वर्षी हा दर सात टक्के इतका होता.