कुलभूषण जाधवांची पाक लष्करप्रमुखांकडे दया याचिका, पाकचा दावा
कराची, दि. 23 - हेरगिरीच्या आरोपातून पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत पाकिस्ताननं नवा कांगावा रचला आहे. कुलभूषण यांनी हेरगिरी केल्याची कबुली देत पाकच्या लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. जाधव यांनी पाकचे लष्करप्रमुख जावेद बाजवा यांच्याकडे केलेला दयेचा अर्ज पाकनं ट्विटरवर शेअर केला आहे. लष्करप्रमुखांनी दयेचा अर्ज फेटाळल्यास जाधवांकडे पाकच्या राष्ट्रपतींकडे याचिका करण्याचा पर्याय असेल, असं म्हटलं जातं.
त्याशिवाय त्यांच्या कथित कबुलीजबाबाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. दहा मिनिटांचा हा व्हिडिओ एप्रिल 2017 मध्ये शूट केल्याची माहिती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच देण्यात आली आहे. 2005 आणि 2006 मध्ये आपण कराचीचा दौरा केल्याचे जाधव सांगत असल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओत 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर त्यांना भारतीय गुप्तचर संस्थेने पाकिस्तानात हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं जाधव सांगताना दाखवलं आहे.