Breaking News

देवगड डोंगरावर राजहंस दूध संघाच्यावतीने वृक्षारोपण

संगमनेर, दि. 29 - दंडकारण्य अभियाअंतर्गत संगमनेर तालुका सह. दुध संघाच्या वतीने हिवरगांव पावसा येथील श्री क्षेत्र देवगड डोंगर परिसरात विविध वृक्षांचे रोपन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी दंडकारण्य अभियानाचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, रामदास वाघ, सौ. निशा कोकणे, शिवाजीराव थोरात, शंकर  खेमनर, अजय फटांगरे, साहेबराव गडाख, नवनाथ अरगडे, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, सरपंच सौ. सुनिता गडाख, प्रा. बाबा खरात, डॉ. राजेंद्र मालपाणी आदिं मान्यवर उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेली हे अभियान वृक्षरोपन व संवर्धनाची लोकचळवळ ठरली आहे. मागील 12 वर्षांत विविध संस्था, विद्यालये, नागरीक यांनी मोठा सहभाग घेतला. प्रत्येकाला आता वृक्षारोपन व त्याची वाढ, जपवणुक ही जाणीव निर्माण झाली आहे. कायम पाऊस कमी असतांना ही तालुक्यात उघडे बोडके डोंगर हिरवेगावर दिसू लागले आहेत. तळेगांव भागातही वृक्ष हिरवीगार दिसू लागली आहेत. या अभियानाचे अरुणा अतंकर यांनी पुस्तक लिहीले यातून रिलायन्स कंपनीचे सुमारे 25 लाख प्रती असलेल्या कॅलेंडरवर याची दखल घेतली तर युनोने सुध्दा नोंद घेतली आहे. देवगड हे तालुक्याचे श्रध्दा स्थान आहे. या परिसरात वनराईमुळे पर्यटन विकास व भाविकांना आधिक सुविधा मिळतील. प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे असे अवाहन ही त्यांनी केले.
आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, पावसाळा सुरु झाला की दंडकारण्य आभियानातील काम सुरु होते. हे तालुक्याचे वैशिष्ट राहिले आहे.  वृक्ष रोपनाची एक मोठी दिशा यातून राज्याला मिळाली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या 84 व्या वर्षी सुरु केलेले हे दंडकारण्य अभियान वरदान ठरणारे आहे.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, प्रा. बाबा खरात यांनी प्रचार प्रसार आभियानातून खेडोपाडी मोठी जनजागृती निर्माण केली आहे. महिलांनी आपल्या घराच्या परसबागा, मोकळ्या जागेत फुलझाडे, फळझाडे लावून त्यांचे संवर्धन करुन या आभियानाला आपले योगदान द्यावे.
आपल्या प्रास्ताविकात रणजितसिंह देशमुख म्हणाले की, श्री क्षेत्र देवगड हे प्राचीन मंदिर आहे. अश्‍वस्पर्धेमुळे या तिर्थ क्षेत्राचा मोठा लौकीक वाढला असून दुध संघाने वनराईसाठी हा डोंगर दत्तक घेतला आहे. विविध वृक्षांचे रोपन करुन हा डोंगर वैशिष्टपुर्ण व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपुर्ण बनविण्यासाठी काम केले जाणार आहे.
यावेळी लक्ष्मणराव कुटे, आर.बी. राहणे, मिलींद कानवडे, रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलग, केशव मुर्तंडक, सुरेश थोरात, रमेश गुंजाळ, दत्तु खुळे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, सौ. निर्मला गुंजाळ, राजेंद्र कडलग, मिनानाथ वर्पे, बाळासाहेब शिंदे, नानासाहेब शिंदे, विलास वर्पे, माणिक यादव, जयराम पावसे, बी. एल. जाधव, दशरथ पावसे, अ‍ॅड. मधुकर गुंजाळ, मथाजी पावसे, अनिल गडाख, रामनाथ गडाख, अशोक भालेराव, डॉ. पावसे, बाळासाहेब उंबरकर, बाबासाहेब फापाळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले.